मंदिराच्या दक्षिण दिशेस असणाऱ्या भिंतीवर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे.पाच फुटी,आठ हातांच्या महिषमर्दिनीने गेली कित्येक दशके अभ्यासकांना वेड लावले आहे.
उजव्या हातात त्रिशुळ,तलवार,चक्र यांसारखी आयुधे तर डाव्या हातात केवळ घंटा आणि शंख हीच आयुधे दिसून येतात.प्रतिमा एवढी सुंदर आणि एवढी आखीव रेखीव आहे,की आजही जगभरातले पर्यटक आणि अभ्यासक मंदिर पाहायला दरवर्षी मोठ्या संख्येने येतात.