IMAGE COURTESY : Source
Source: medium
कहाणी पहिल्या भारतीय वैमानिकाची
आज रोजी इतिहासात डोकावून सांगायचे झाले तर आज पहिले भारतीय वैमानिक जन्माला आले. त्यांचे नावं पुरषोत्तम मेघाजी काबाली. पहिले भारतीय वैमानिक आणि स्वातंत्र्य सैनिक पुरषोत्तम मेघाजी काबाली यांचा मुंबई येथे दिनांक ८ एप्रिल १९०६ रोजी जन्म झाला., जर्मनीतील जंकर्स फ्लूगसाईंग नावाच्या विमान उड्डाण शास्त्राचे प्रशिक्षण देणाऱ्या एकमेव नामांकित संस्थेत त्यांनी विमानाचे उड्डाणाचे प्रशिक्षण १९२८ ते १९३० या कालखंडात पूर्ण केले. त्या संस्थेत प्रवेश घेणारे ते पहिले व एकमेव भारतीय विद्यार्थी होते.
१९३० साली या भारतीय नवं तरुणानं Spartan VT-AAT(c/n 31) या विमानाची डिलिव्हरी घेतलीच ती मुळात आपल्या भूमीत पंख पसरवून झेप घेण्याच्या इराद्यानं. त्यामुळे पुरषोत्तम मेघाजी काबाली पहिले भारतीय वैमानिक ठरले. क्रॉयडन हवाईतळाहून उडाण घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या या Spartanची विधिवत पूजा केली होती, तेव्हा सरोजिनी नायडू या तिथे उपस्थित होत्या, यासोबत टाटा समुहाचे दोरबजी टाटा, कूच बिहार संस्थानच्या राणीसाहेब, ब्रिटीश प्रधानमंत्री लॉयड जॉर्ज ही मान्यवर मंडळी तेथे हजर होती.
क्रॉयडन विमानतळाहून उड्डाण घेतल्यावर लीबियायातील टोब्रूक, त्रिपोली दरम्यानच्या वाळवंटात उठलेल्या वावटळीमुळे काबाली अपघातग्रस्त झाले होते. पुढे ते अपघातग्रस्त विमान सुट्या भागांमध्ये मुंबईत आणण्यात आले. मुंबई डॉकयार्डात त्यावर उपचार केल्यानंतर काबालीसाहेबांच्या मनातली उड्डाणे रुपास आली.
पुढे १९५३ साली भारतीय एयरलाईन्स कॉर्पोरेशनमध्ये विलीन होण्या अगोदर "एयर इंडिया ऑफ इंडिया लिमिटेड" या कंपनीच्या नावाखाली ३० ते ४० च्या दशकात Dragon Rapides आणि Dc-3s श्रेणीची उड्डाणे त्यांनी स्वतः केली. मोठ्ठेपल्ले विमानाने मारणे जेव्हा स्वप्नवत वाटायचे तेव्हा काबाली यांनी बारक्या विमानांतून बऱ्याच मोठ्या पल्ल्याची उड्डाणे केली. जी तेव्हाच्या सामान्य वैमानिकांच्या आवाक्या बाहेरची ठरली आणि काबाली हे काहीतरी विशेष आणि वेगळे व्यक्तिमत्व म्हणून झळकू लागले. कबाली साहेबांनी आपल्या विमानाचे नाव "Feather Of The Dawn" असे ठेवले होते.
तो काळ होता स्वातंत्र्याचा., नव्या उमेदी मनात निर्माण होणाऱ्या भारतीय राष्ट्रनिष्ठ नागरिकांचा आणि त्यावर कठोर पणाने पाय ठेवत चिरडत आपले साम्राज्य लादणाऱ्या ब्रिटिशांचा., सगळीकडे चालू असणाऱ्या या स्वातंत्र्यसमरामध्ये एक भारतीय या नात्यानं काबाली यांचाही सहभाग हा होताचं होता. तेव्हा गांधीजींचा मिठाचा सत्याग्रहान सर्व जनमन व्यापून ब्रिटीशांची तोंडं खारी केली होती., काबालीसाहेबांनी महात्मा गांधींच्या या मिठाच्या सत्याग्रहाची प्रचारपत्रके विमानातून सर्वत्र टाकली.
विमानातून केलेल्या त्या प्रकाराबद्दल त्यांना देशद्रोही म्हणून अटक करण्यात आली. काही महिन्यांनी शिक्षा भोगून ते सुटले. आता एकदा तुरुंगातून बाहेर पडले पण तरी त्यांची राष्ट्रनिष्ठा, स्वातंत्र्यसैनिकांना मदत करण्याची वृत्ती उणावली नव्हती तरी आपल्या उड्डाणाप्रमाणे ती उंचावतचं गेली होती. पुढे त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना आपल्या विमानातून परदेशात नेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुण्याजवळ हडपसर येथे ग्लायडिंग क्लब काढण्यात आला. त्याची मुहूर्तमेढ व भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
Share on: