एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: Blogspot

सारं सारं काही आठवतं आहे आम्हाला.

 "तुम्ही झोपला होतात सई.......!"

"नाही आम्ही झोपलो नव्हतोचं मुळी, आम्ही सताड जागे होतो, सारं सारं काही आठवतं आहे आम्हाला.," 

"औसाहेब संगांना राजांना........... आम्हाला सारखेचं डिवचत असतात हे., म्हणे कि आम्ही तेव्हा झोपलो होतो म्हणून" 

परकर पोलक्यातली सई अगदी धूडधूड पावलांनचं काहीशी पळत, पोलकं सावरत, अगदी दारावर येऊन ठेपलेल्या., रडण्याला आवरत जिजाउंकडे, उमाबाईंच्या - आपल्या आजंसासूच्या खाजगीत येऊन उभारल्या.शेवग्याच्या शेंगेवर लगडलेलं चंद्रमुखी, पौर्णिमेचे तेज शिंपलेलं ते मुखकमलावर येऊन ठेपलेले बांध कसेबसे धुमसतचं थोपवून ठेवले होते. खाजगीत येऊन उमाबाईंच्या शेजारी बसून असलेल्या जिजाऊने हालक्या स्वरातचं प्रश्न केला  

"काय गं पोरी काय झालं तुला असं स्फुंदायला?? काय केलं आता सिवबानं तुला???" 

सासू, आजंसासू दोघीही मोठ्या मुश्किलीनं आपल्या चेहऱ्यावर येणारं हसू काहीबाही कारणं काढत लपविण्याचा, आपल्या खाजगीतील दरबारी सिवबास पुन्हा दोषी ठरविण्याच्याचं आवेशात ठाण मांडत्या झाल्या...! आधीच आरोपी ठरलेल्या शिवबा राजानं जेव्हा खाजगीत प्रवेश केला तेव्हा समोरचा प्रसंग पाहता, यंदाही फक्त आपल्याला शिक्षा सुनावणी तेवढी बाकी राहिली आहे., हे कळून चुकले होते. 

"सिवबा राजे काय? काय करता आपण का आमच्या सई ला सारखे त्रास देत असता तुम्ही"??? 

"क्षमा असावी औसाहेब पण आम्ही आम्ही असे काही एक केले नाही., याचं चिडून पळून आल्या इकडे"

"पण नक्की झाले काय होते तुम्हाला चिडाचीड करायला" आज्जीनं थोडा स्वर खरखरीत केला तेव्हा कुठं सईबाईंच्या चेहऱ्यावर समाधान झळकू लागलं आणि आपलं हसू लपवत हे दोन्ही सासवांनी बरोबर ताडलं. 

"आज्जीसाहेब आम्ही व्हरांड्यात बसून दोघेही बुद्धीबळ खेळ होतो".... एकंदरीत प्रकरण नेहमीच असल्यासारखं वाटल्यानं दोन्ही सासवा थोड्या निश्चिंत झाल्या आणि एक नेहमीच्याच कटकटीची हास्यमय लकीर 

दोन्हीचेहऱ्यावर उमटली, "असेचं खेळता खेळता, कालच्या जेधेंच्या घरातल्या लग्नाचा विषय निघाला, त्यावरून आमच्या लग्नाचा - वरातीचा विषय निघाला., आणि आम्ही सईबाईना म्हणालो कि लालमहालाच्या दरबारी जेव्हा मेणे आले तेव्हा तुम्हीं चक्क झोपल्या होतात त्यावरून या चिडून, सगळा डाव अर्ध्यात मोडून निघून आल्या., आम्ही काहीच तर केले नाही" 

आता कुठल्याचं बांधाना या मजामस्ती, आनंद, सौख्याचा, हास्याचा येऊन ठेपलेला लोट अडविणे म्हणजे अशक्य पटीतील गोष्ट झाली होती. दोन्ही सासवांनी एकमेकिंना जवळजवळ मिठ्या मारत झोकांडून देत जी हासायला सुरवात केली कि, संपूर्ण खाजगी बैठकीची ही सदर खडबडून जागी झाली असावी., शिवबा तर आज पहिल्यांदा आपल्या बाजूने लागलेल्या या निकालानं थक्क होऊन जागच्या जागी आ वासून उभारले होते., सत्तेत नसतानाचा हा विजय त्यांना अतिशय धक्कादायक ठरला., तर नेहमी आपल्या बाजूने ठाम राहणाऱ्या, ज्यांच्यापर्यंत गेल्यावर राजांना तंबी मिळतेचं मिळते अश्या दोन्ही सासवांनी आज आपली दखल सुद्धा घेतली 

नाही म्हणून., जागी बैठक मारून मुसुमुसु रडायला सईबाईंनी सुरवात केली होती

रात्रभराच्या वरातीचा कार्यक्रम पार पडल्यावर पहाटे वधुवर वाड्याच्या दाराशी आले. शके १५६२ विक्रमनाम संवत्सर, वैशाख शु||५. १६ एप्रिल १६४० वाड्याच्या दाराशी उंबरठ्यावर ठेवलेले माप सांडून भोसल्यांच्या घरात गृहलक्ष्मीने प्रवेश केला. दाराच्या आत धान्य विखुरले. सईबाई राजांच्या थोरल्या राणीसरकार जाहल्या होत्या" पण त्याआधी चक्क उमाबाई साहेबांनीचं छोट्याश्या सईला डोळ्याला पाणी लावून हळुवारपणे उठवले होते. रात्रभर डोक्यावर बत्त्या घेऊनघेऊन माना अवघडलेल्या बत्तीवाल्यांनी देखील आता आपल्या माना टाकल्या होत्या. कसबा गणपतीचे दर्शन करून मेणा लालमहाली आणण्यात आला. गार पाण्याचा डोळ्याला हात लागलेल्या सईबाई भोसल्यांच्या देवाऱ्याकडे प्रस्थानकरत्या झाल्या.  

पदूबाईचे दर्शन करून, दोन जीवांच्या, भरल्या अंगाच्या सईबाई मंदिरापुढील पायऱ्यांजवळील बस्करीवर थोड्या निवांत झाल्या मंदिरातून येऊन इथं बसे पर्यंत राणीसाहेब चांगल्याच घामजल्या होत्या., आकाशातला उन्ह सावल्यांचा खेळ ऐन रंगात होता तर समोर दिसणाऱ्या सिंहगडापलीकडील पुण्याच्या आपल्या लालमहालातील त्याप्रसंगांची माळ मनी पुन्हा ओढता ओढता बसल्याजागी डोळ्यात आठवणींचा राजगड उभारला होता......!

Share on:

Comments





Recent Comment's

No comments available.


Related Blogs

×

Subscribe To Newsletter