एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: amazon

सलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटीश सेना ताबा मिळवताना

माणेकशॉ यांचे भारतीय सैन्यातील आयुष्य हे चाळीस वर्षांचे असून, दुसर्या महायुद्धापासून ते भारताच्या तीन चीन व पाकिस्तान विरुद्ध युधांपर्यंत होते.दुसऱ्या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना, माणेकशॉ बर्मा येथील सिटांग नदीच्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटीश लष्कराने नुकसान सोसूनही मोहिम फत्ते पाडली.

 

येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटीश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ यांना एल.एम.जी. च्या गोळ्या लागल्या व गंभीर जखमी झाले. मेजर जनरल डेव्हिड कोवाननी माणेकशॉना वाचवले. सैनिकी सूत्रांनुसार माणेकशॉ यांच्या नेतृत्त्वाने ती मोहिम यशस्वी होण्यास मदत झाली. यात जखमी झालेले असताना रंगूनमध्ये डॉक्टरांनी माणेकशाँची जगण्याची शक्यता कमीच ग्राह्य धरली होती. तुम्हाला काय झाले असे डॉक्टरांनी विचारले असताना माणेकशॉ म्हणाले होते की `मला गाढवाने लाथ मारली' मरणाच्या दारातील या व्यक्तीचे उत्तर पाहून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व ते यशस्वी झाले.

 

माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने तत्कालीन भारताचे राष्ट्रपती वराहवेंकट गिरी यांनी माणेकशॉ यांना १९७२ पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले. जानेवारी १ १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही.

 

जानेवारी १५ १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृती घेतली. निवृती नंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोमेंट जवळील कून्नूर या शहरात रहात होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पद भूषवले.

 

माणेकशॉ यांचा २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात रात्री १२.३० वाजता न्युमोनियाच्या दीर्घ दुखण्याने निधन झाले.

Share on:

Comments





Recent Comment's

No comments available.


Related Blogs

×

Subscribe To Newsletter