
IMAGE COURTESY : Source
Source: yourstory
आयुष्यातील ९० दिवस.....!
आयुष्यातील ९० दिवस.....!
तसं पाहता आयुष्यातील ९० दिवसांचा काळ म्हणजे नगण्यचं, आम्हीतर उन्हाळी - दिवाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षाचे तीन महिने घालविले आहेत., आणि ते किती लवकर संपून जायचे हे आजही आठवते. मोक्कार फिरत जगणाऱ्या आपल्यासारख्यांना तीन काय सहा महिन्यांचा काळ सुद्धा किरकोळचं असतो., पण जेव्हा हाच तीन महिन्यांचा काळ जगातील सगळ्यात उंचीवरल्या युद्धभूमीवर व्यतीत करायचा असतो, तेव्हा या साऱ्या गोष्टी उंचचं उंच जाणवतात.
सियाचीनला राहणं म्हणजे निसर्गाशी लढाई आहे. तरी तिथे आपलं सैन्य राहतं. दिवाळी असो वा ईद, उन्हाळा असो वा हिवाळा ते त्यांच्या कामात व्यग्र असतात. तिथे होणारी छोटीशी चूक, दुर्लक्ष त्यांच्या आणी पर्यायानं देशाच्याचं महागात पडणारं असतं. तिथलं ९० दिवसांचं आयुष्य म्हणजे खरचं दिव्य असतं. या कालावधीत जगातील सर्वात मोठी हिमनदी, जिला तिसरा ध्रुव म्हटलं जातं अशा ठिकाणी राहायला मिळण म्हणजे नशीबचं, म्हणूनचं ते बर्फातील प्रचंड भेगा पार करणं असो, बर्फाची उंचचं उंच (१५०० फुट) भिंत चढण असो, वा फ्रॉस्टबाइट, चिलब्लेन, स्नो ब्लाइंडनेस, हायपरटेन्शन, पल्मनरी एडीमा, हाय अल्टीट्युड पर्मनरी एडीमा, सेलेब्रेल एडीमा यांना पुरत उरत आपला काळ तिथे काढतात.
आर्मी आणि एअरफोर्सची माणसं या भागात तैनात असतात. नेव्हिला या भागात करता येण्यासारखं काही नसतं. दोन्ही फोर्सचा पहिला पाडाव दिल्ली किंवा चंदीगढला. इथून विमानानं थॉइज या विमानतळावर न्हेलं जातं. हे म्हणजे जगातील सर्वात उंचावर असणारं विमानतळ.
विमानातून बाहेर उतरताचं थंडीची पहिल्या लाटेनं आपलं स्वागत होतं. हि नुसती झलकचं. आता उंची, विरळ हवा, थंडीच्या लाटा, बेफाम वेगानं वाहणारा वारा या साऱ्याची, आणि या हवेत श्वास घेणं, चालण, बोलण, जगण याचीही तयारी करायची असते. म्हणूनचं पुढचा पाडाव परतपूरला उंची, कमी हवेचा दाब, बोचरी - जीवघेणी थंडी, अत्यल्प ऑक्सिजनचे प्रमाण या साऱ्या गोष्टीचा सराव होणे गरजेचा असते. विशेष म्हणजे इथे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये देखील बदल करावा लागतो. परतपूरचा हा कॅम्प सहा दिवसांचा. त्यातले पहिले दोन दिवस हे फक्त बसून आराम करून, वातावरणाशी स्वतःला मिळते जुळते करून घेणे, पुढे सियाचीन वरील सर्वात महत्वाचा सराव असतो तो म्हणजे एकटेपणाचा..... जवळच्याचा दिवसभरात कॉल आला नाही / आपण केला नाही, भेटलो नाहीतर दिवस चुकल्याचुकल्या सारख्या गेल्याची खंत हि राहतेचं पण या युद्धभूमीवर दरक्षणाला आपणचं आपल्याला भेटावं लागतं
नंतर इथे चालायला शिकवतात, दोन दिवसांनी चालण्याच्या क्रियेत पाठीवर सात - आठ किलोचे वजन येते. इथे रस्ते नाही ना काही नाही त्यामुळे इथे जवानांना आपलं ओझं आपण स्वतः वहावं लागतं. प्रत्येक सैनिकाचा जीव लाखमोलाचा असतो. म्हणूनचं कोणता धोका पत्करला जात नाही. ठरल्याप्रमाणे दिनचर्या आणि सराव करून घेतला जातो.
तरही अश्या विषम परीस्थितीमध्ये जाणे म्हणजे आपल्या जवानांना भाग्यचं वाटतं, प्रत्येकाच्या नशिबी हा क्षण येऊ शकत नाही, हि त्यांची या मागची भावना....!
पराक्रमाची अखंड पराकाष्ठा करणाऱ्या या सर्व वीरजवानांची कधी आपल्याकडून उपेक्षा होऊ देऊ नका., ते आहेत म्हणूनचं आपण आहोत हे कधीही विसरू नका., विभाजनवादी या दुनियेच्या जत्रेत #हम_सब_एक_है हे विसरू नका., आपण तर तुकड्यातुकड्यात जगलोय आता नव्या पिढीला #राष्ट्रप्रथम हा आदर्श द्यायला विसरू नका.....!
Share on: