IMAGE COURTESY : Source
Source: architecturaldigest
गुंगी गुडिया काय किंवा आणीबाणी मुळे माथेफिरू म्हणून ज्यांचं प्रतीचारित्र्य
#मुरब्बी_राजकारणी_इंदिराबाई
गुंगी गुडिया काय किंवा आणीबाणी मुळे माथेफिरू म्हणून ज्यांचं प्रतीचारित्र्य बनवलं गेलं त्या देशाच्या एक कर्तृत्ववान प्रधानमंत्री, आदरणीय इंदिराची गांधी यांचा आज जन्मदिवस. कुठल्याही गोष्टीची जाहिरात न करता देखील अनेक मनसुबे तडीस नेता येतात आणी राजकारणात याच गोष्टीला चातुर्य मानले जाते हि समज असणाऱ्या नेत्या देशाला लाभल्या व त्यांना देशसेवा करता आली हे त्यांचे भाग्य म्हणता येईल.
एकीकडे चीन तिबेटवर ताबा मारण्यासाठी आसुसलेला होता तर दुसरीकडे पाकिस्तान पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) ला नको नको करत होता. त्यावेळी भारताने चीनच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार केलेले तिबेटी सैन्य इंदिराबाईंच्या मुरब्बी राजकारणाततून बांगलादेशाच्या लढाईसाठी तयार झाले. आणी "भारतीय सैन्यदलाच्या" इतिहासातील पहिला "ज्ञात" सर्जिकल स्ट्राईक जन्माला आला.
याची सुरवात नोव्हेंबर 1971 मध्ये भारत - पाक युद्धाच्या 15 दिवस झाली. ऑक्टोबरमध्ये चक्रातायेथून 3 हजार कमांडोजना हलविण्यात आले. त्याची खबर सैन्यात इतर कुणाला नको म्हणून सैन्याची विमाने देखील वापरण्यात आली नाहीत. कलकत्त्याच्या डमडम विमानतळावरुन पुढे मोटारीतून तीन दिवसांचा प्रवास करत हे सैन्य बांगला भारत सीमेवर असणाऱ्या मिझोरामच्या डेमागिरीला गेले. तिथे काही दिवस शरणांगतीमध्ये मिसळून राहिले, सारे काही बिन बोभाट. सीमेपलीकडले चितगावचे पर्वतीय क्षेत्र, कर्णफुली नदीवरलं धरण, नद्यांवरील पूल सारच तर उध्वस्त करायचे होते. यासाठी बल्गेरियातुन ak 47 व अमेरिकतून कार्बाईन्स मागविण्यात आल्या होत्या. मारा आणी पळा हेच हल्ल्याचे स्वरूप पक्के करण्यात आले होते.
या सैन्याने असे हल्ले करून परिसरावर जबरदस्त दहशत बसविली होती. या सैन्याचे तीन भाग करण्यात आले होते 12 नोव्हेंबरला या तुकड्या कर्णफुली नदीमार्गे बांगलादेशमध्ये घुसल्या. दलदल, पाणथळ, दाट जंगलाचा तो भाग याचाच आडोसा घेऊन पाकिस्तानी फौज बसली होती पण त्यांचे सगळेच प्रयत्न विफल ठरले या सैन्यासह मिसळलेले मुजाबवाहिनीचे काही स्वातंत्र्यसैनिक होते, जंगल युद्धात त्यांचा हात धरणे मुश्कील होते.
गनिमी काव्याने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करत पण हे जवान येतात कोठून आणी जातात कोठे याचा ठाव ठिकाणा लागत नसे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही तासातच या सैन्याने अनेक ठाणी जिंकली होती. एका दगडात दोन पक्षी या हिशोबाने पूर्व पाकिस्तानचे कंबरडे मोडत दुसरीकडे याच चितगावच्या पर्वतीय प्रदेशात लपणाऱ्या मिझो बंडखोरांनाही शरणागती पत्करायला भाग पाडले होते.
पण सगळे काही बिन बोभाट...! कारण शत्रूराष्ट्र हे आक्रमक आहे, आपला देश मात्र नैतिकतेने वागणारा आहे, अशी प्रतिमा आंतरराष्ट्रीय समुदायात असणे हे फायद्याचेच असते. ते नैतिक बळ गमावणे हे परराष्ट्र धोरणातील अपयश मानले जाते. म्हणूनच गुप्तचारांच्या कारवायांबद्दल बढाया मारायच्या नसतात. आम्ही अमुक करणार, आम्ही तमुक करणार असे सत्ताधाऱ्यांनी कधी जाहीर सभातून बोलायचे नसते व इंदिराजी गांधी यांनी यासंदर्भात कधी वाच्यता देखील केली नाही.
निक्सन व इंदिरा गांधी या दोघांच्या भारत पाकिस्तान युद्ध विषयाहून झालेल्या मुलाखतीचं वर्णन अमेरिकेचे धूर्त परराष्ट्रमंत्री हेन्री किसंजर त्याच्या एका पुस्तकात लिहितात, "निक्सन व इंदिरागांधी दरम्यानची ती भेट म्हणजे दोन बहिऱ्या माणसांची भेट होते ! (ज्या दुसऱ्यांच म्हणनं ऐकतचं नाही अश्या) भोळेपणाचं नाटक कसं करावं, ह्यात इंदिरा गांधीचा हात कोणीही पकडू शकणार नाही. एक स्त्री इतकी मुत्सद्दी असते हे मी प्रथमचं पहिले"
अभिषेक कुंभार
Share on: