एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: Facebook

दोन दिवसांपासून पोस्ट पाहतोय. फेसबुकवर काही लोक सध्या थोरल्या शाहू छत्रपतींवर घसरत आहेत.

 थोरले शाहू छत्रपती 'हिंदुपतीच'


दोन दिवसांपासून पोस्ट पाहतोय. फेसबुकवर काही लोक सध्या थोरल्या शाहू छत्रपतींवर घसरत आहेत.. हिंदुपती या शब्दाचे वाटेल तसे मनाला अर्थ लावून महाराजांना एका विशिष्ट चौकटीत अडकवू पाहत आहेत. त्या सर्व लोकांना ही पोस्ट समर्पित. हिंदुपती म्हणजे हिंदूंचा अधिपती? हे कुठे वाचले.. मुळात हा शब्द आला कुठून.. तो मराठ्यांच्या छत्रपतीला का लावला ह्याचा शोध घेण गरजेचे आहे.


इसवी सन 1718-19 चा घारगे देशमुखांचा एक मझहर प्रकाशित आहे. गावकी-भावकीचा वाद आता महाराष्ट्राला नवीन नाही. गावांच्या देशमुखीचा हा वाद थोरल्या शाहू छत्रपतींकडे आला होता.. गोतसभा बसवण्यात आली आणि स्वता थोरल्या शाहू छत्रपतींनी याचा निकाल दिला तेव्हा हा मझहर प्रकाशित करण्यात आला. त्या मझहर वर 'राजश्री शाहूजी राजे भोसले देशमुख प।। वाई' असा थोरल्या शाहू छत्रपतींचा 'वाईचे देशमुख' असल्याचा शिक्का आहे. याच मझहरीच्या शेवटच्या भागात एक वाक्य आहे,

'महाराज साहेब ह्मणजे हिंदुपती बादशाह ईश्वराचे अधिष्ठान आहे, जे इंसाफ कराल त्यात कुसूर ठेऊ नये ह्मणजे चंद्र सुर्य आहेत तोपर्यंत किर्त राहील.'

1719 च्या या मराठी भाषेत आणि मोडी लिपीत लिहिलेल्या मजकुरात आपली लोक थोरल्या शाहू छत्रपतींना 'हिंदुपती बादशाह' असे विशेषण लावून सन्मान करतात.


एवढंच नव्हे, तर दुसऱ्या शाहू छत्रपतींच्या आज्ञेवरून थोरल्या शाहू छत्रपतींची बखर लिहिण्यात आली. त्यामध्येही दिल्लीची पातशाही वाचवणाऱ्या शाहू छत्रपतींविषयी बखरकार लिहीतो,

'दिल्लीची पातशाई हिंदुपती करितात'. आता जर आपण शिवछत्रपतींच्या आज्ञेने परमानंद, कवी भूषण इ. यांनी लिहिलेले ग्रंथ प्रमाण मानत असू तर इथेही साक्षात छत्रपती घराण्यातील एका जबाबदार व्यक्तीने ही बखर लिहून घेतली आहे, हेसुद्धा आपण लक्षात ठेवायला हवे. Administrative system of Jodhpur princely state (इसवी सन 1300 ते 1800) या पुस्तकात हिंदुपती या शब्दाचा योग्य अर्थ दिला आहे.. हिंदुपती म्हणजे हिंदुस्थानची बादशाही चालवणारा व्यक्ती.. आपण हे कधी वाचतो का? का मनाला येईल तसे अर्थ लावत आपले निष्कर्ष (ज्याला कवडीमोल ही किंमत नसते) मांडतो? एवढंच काय तर स्वता शहाजी महाराजांविषयी असलेला एक छंद इथे देतो, तो वाचून तुम्हीच ठरवा..

"कर्नाटुक मध्यो सिंधु 'हिंदुपति पातशाह' पिनगोडा गठवीव करि मानो रयी है ।

काठे बर रतन सो तन हि मोजत न राखि दुसमनको बिंखु दे पिउंख मुनि लयी है ।

सात सिंध सेवट लो खेवट जहाज बिन किरतिये तेरी पैरि पारावार छयी है ।

सबसो संगति हेरिवथ गीत उगति मेरि सो चातुकी चोप तेरीचेरी आन भयी है ॥५५॥"


जर तुम्ही एवढे अस्सल आणि समकालीन शब्दांविषयी आग्रही असाल तर हिंदुपती या शब्दाविषयी सुद्धा असायला हवे. हा केवळ एक शब्द नाही तर संपूर्ण भारतावर एक मऱ्हाटा छत्रपती शासन करतोय, याचे प्रतीक आहे.. आणि आपण अभिमानाने हा शब्द मिरवायला हवा.. का उगाच तुमचं मन सांगतय म्हणून हिंदूंचे अधिपती करणार? स्वता शाहू छत्रपतींच्या शिक्का असलेल्या त्या मझहरीत आपल्याच पूर्वजांनी लिहून ठेवलेला हा शब्द इसवी सन 1718-19 मधेच 'संपूर्ण हिंदुस्थान चालवण्यास एकमेव व्यक्ती' थोरले शाहू छत्रपतीच आहेत हे सांगू पाहतोय..

त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, ज्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला पाहीजे ती आपण नक्कीच मिरवायला हवी.. उगाच मनाला वाटेल तसे फाटे फोडत शब्दाचा विपर्यास करणे थांबवा..


हिंदुपती थोरले शाहू छत्रपती यांचा विजय असो..

Share on:

Comments





Recent Comment's

No comments available.


Related Blogs

×

Subscribe To Newsletter