IMAGE COURTESY : Source
Source: Facebook
माणूस हा पृथ्वीतलावर सापडणाऱ्या त्या दुर्मिळ प्राण्यांप्रमाणे आहे ज्यांचं वर्तन कधीच
माणूस हा पृथ्वीतलावर सापडणाऱ्या त्या दुर्मिळ प्राण्यांप्रमाणे आहे ज्यांचं वर्तन कधीच एकसारखं किंवा कधीच नमूद करता येण्यासारखं नाही., खरं तर इतर अजून असे कुणी दुर्मिळ प्राणी आहेचं, हे सुद्धा सांगण कठीण जावं एवढं तुमच्या आमच्या जिवंत हाडामांसाच्या जीवांचं वागणे भिन्नभिन्न स्वरूपाचं असतं. देव, देश धर्म, ह्या तीन प्रमुख चाळणी सोडल्या तरी खाली पंथ, आवड निवड ह्या गोष्टी येतातचं. काही जणांना चालू वर्तमानात जगण पसंत असतं तर काहींना इतिहासात कुणी पैश्यात खेळतो तर कुणी मातीच्या ढिगाऱ्यात, कुणाला काय आवडेल नी कुणाला काय याचा खरं तर नेम नसतो. कुणी गाण्यात रमतो तर कुणी गण्यात आणि कुणी रंगात तर कुणी आपापल्या ढंगात.
प्रत्येक आवडीनिवडीनुसार ज्याला त्याला आपापल्या आवडीच्या, निवडीच्या, पूज्यनीय, वंदनीय या गोष्टी असतातचं. मराठ्यांमध्ये जसे सर्वोच्चतेच्या परिमाणतेला "शिवाजी" या उपाधीनं (आम्हीतरी) संबोधले जातं, त्याचप्रमानं, अश्या सर्वोच्च किंवा स्फुर्तीस्थानांना "पंढरी" म्हणायची रीत जोपासली जाते., वादन क्षेत्रामध्ये रमणाऱ्या वादकांना पुणे म्हणजे वादन पंढरी, मावळातील धारकऱ्यांना "राजगड" म्हणजे मावळपंढरी तसं सर्व बाईकवर बिऱ्हाड बांधून फिरणाऱ्यांना लडाख म्हणजे रायडर पंढरी म्हणावी लागते. एकीकडे चीन आणि दुसरीकडे पाकिस्तान अश्या आपल्या देशाच्या परम स्नेही शेजाऱ्यांच्या कुरापातींना समर्थपणे तोंड देत लडाखची ही ओसाड जमीन अगदी जिवंतपणात सीमेवरील जवानाच्या रूपानेचं उभी आहे असे म्हणावं लागेल. इथं खूप खूप गोष्टी रुतल्या आहेत. प्राचीन इतिहासाच्या, काही अर्वाचीन इतिहासाच्या, स्वातंत्र्य फाळणीपूर्वीच्या किंवा अगदी अलीकडल्या म्हणजे गांधीनंतरच्या भारतातल्या. त्यातलाच एक प्रसंग ज्यानं देशाला २१ ऑक्टोबर हा पोलीस स्मृतिदिन स्वरूपात साजरा करण्याला भाग पाडलं.
दरवर्षी देशात २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस - स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. याचा थेट सबंध १९५९ मध्ये घडलेल्या एका बलीदानाशी आहे.
१९५९ पर्यंत लडाखच्या दुर्गम - डोंगराळ प्रदेशाच्या संरक्षणाची जवाबदारी भारतीय पोलीसदलाकडे होती. लडाखमधले ६ हजार उंचीवरलं हॉटस्प्रिंग नावाचं ठिकाणं. तिथे असणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यामुळे या जागेला हे नाव पडलं., सोनाल वांग्याल या धाडसी विरामुळे चीनी लोकांची लबाडी साऱ्या देशाला कळाली. जेमतेम १८ वर्षांच्या सोनाम यांना कुणीतरी विचारलं सैन्यात भरती होणार का?, त्यावर होकार कळवत, जुजबी शिक्षण घेत त्यांनी सैन्यात आपली जागा नक्की केली. भारत - तिबेट (चीन) सीमेवर हे वांग्याल रुजू झाले. एकदा टेहाळणीसाठी गेलेले असताना, त्यांना खंदक खणणारे चीनी सैनिक दिसले आणि हा भाग भारतीय हद्दीतला होता. जीवघेणी थंडी, धाप लागणार विरळ वातावरण, आणि एकाकीपणा या सगळ्यात वांग्याल यांनी हि बातमी बिनबोभाट आपल्या नजरेत टिपून आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातली.,
चीनने एकतर्फी केलेल्या कारवाईच्या निरीक्षणासाठी एक पथक प्रत्यक्ष त्या प्रदेशात पाठवायचं ठरलं. भारतीय पोलीस दलांमधल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या प्रतिनिधीना या मोहिमेवर पाठविण्यात आले. वाटाड्या म्हणून वांग्यालही त्यांच्या सोबत होते. या मोहिमेचं नेतृत्व होते ते पंजाबचे पोलीस उपअधीक्षक करमसिंग. लेहपासून २०० किलोमीटर प्रवास करीत शेकडो मीटर उंचीच्या अनेक खिंडी पार पाडत १९ ऑक्टोबर १९५९ रोजी हे पथक हॉटस्प्रिंगला पोहचले. तंबू टाकून रात्रीचा मुक्काम ठरला. त्यातले ठराविक काही लोकं पुढे जातील आणि बाकीचे त्या तळावर राहतील. असे ठरले मागे राहणाऱ्यांमध्ये वांग्याल हे देखील एक.
२० ऑक्टोबर रोजी सकाळी तुकडीनं टेहाळणीला सुरवात करावी आणि आपलं काम संपवून संध्याकाळपर्यंत ह्या तुकडीनं परतण अपेक्षित होतं. पण त्यापैकी कुणीच परत आले नाही, म्हणून चाळीस पोलिसांची एक पथक त्यांचा शोध घेण्यासाठी निघाले. आता सोनम वाटाड्या नसून त्या पथकातलाचं एक म्हणून होता. बरचं पुढे गेल्यावर त्यांना तीन चिनी सैनिक दिसले., त्यांनी हवेत एक राउंड फायर केला., तेव्हा आपल्या पथकानं देखील बचावाचा पवित्रा घेतला. व ते पुढे जाऊ लागले. त्याचदरम्यानं तिथल्या एका खंदकातून शेकडो दुश्मन सैन्य आपल्या गस्ती पथकावर तुटून पडले. अंधाधुंद आणि बेसुमार गोळीबार झाला. त्यात आपले अनेक पोलीस धारातीर्थी पडले. करमसिंग यांनी काही सैनिक वांग्याल यांना सोबत देऊन हॉटस्प्रिंग येथे जाऊन हि सारी हकीकत सांगायला सांगितले. आपल्या पोलीस दलाच्या अचूक आणि परीणामकारक कृतीनं चिनी सैन्य पुढे सरकू शकले नाही. पण सोनाम वांग्याल यांच्यासह परतलेल्या ८ - १० सैनिकांशिवाय मागे बऱ्याच पोलिसांना वीरमरण आले तर काहींना जख्मी अवस्थेत चीनी सैन्यानं ताब्यात घेतले . याच बातमीनं साऱ्या देशाला दुःख झाले आणि यातूनचं पुढे इंडो - तिबेट सीमा पोलीस, सीमा सुरक्षा दल इत्यादींची उभारणी झाली.
१३ नोव्हेंबर १९५९ रोजी चिन्यांनी या हुतात्म्यांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. १४ नोव्हेंबर १९५९ रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या मृतदेहांवर हॉटस्प्रिंग येथेच सन्मानपूर्वक अत्यंसंस्कार करण्यात आले. १४ नोव्हेंबर हा तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जायचा, त्यामुळे ह्या दिवशी चीनने केलेली मुद्दाम कृती होय.
अश्याच एका कार्यक्रमाला हेमंत करकरे हॉटस्प्रिंग येथे हजर असताना, झालेल्या कार्यक्रमात साहसी वीर सोनाम वांग्याल उपस्थित होते त्यांनी त्या कार्य्रक्रमात सांगितलेली त्या दिवसाची आठवण करकरे साहेबांनी लोकसत्ताच्या आपल्या लेखात वांग्याल यांच्या भाषेत दिली ती अशी.
"....बहुत तकलीफ था साब... पतला कपडा... पतला जुता... खानेको सिरीफ सत्तू, लेकीन हमारा दिल बहुत मजबूत था, साब !
हमारे साथिका डेड बॉडी हम अकेला घोडेपे बांध के लाया. कमांटडंटसाबने पूछा, सोनम, अब कहा ड्युटी करना है ?
...तो हमने बोला, की हम हॉट - स्प्रिंग जायेगा | हमारा साब बहुत खूष हुआ, हमको हवालदार बनाया !
हमको इतनी ख़ुशी हुई के लेह के बज्जारमे हम कंधेपर पट्टी लगाकर पच्चास बार घुमा......"
पोलीस स्मृतिदिनानिमित्त प्रत्येक साहेबांना एक कडक सेल्युत........... />
आपको है सलाम जिंदगी
Share on: