एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: socialbuzzness

ज्याच्या घरासमोर मोठे अंगण असेल,ते त्या गावातील गुरुजनाचे-मार्गदर्शक (मुख्य) माणसाचे घर..

महाराष्ट्रातील पहिली शेती : इतिहास भूमीपुत्रांचा


शेती म्हणजे जगाचा आत्मा..शेतीचा आणि माणसाचा दृढभाव खूप जुना आहे.पशुपालन-शेती जवळ जवळ एकाच वेळेस सुरू झाले..आणि इथूनच सुरुवात झाली माणसाच्या आधुनिकतेकडे आणि प्रगतीकडे..


नंदुरबार पासून 20 किलोमीटर वर एक छोटे गाव..आपल्या पोटात ऐतिहासिकतेचा वारसा दडवून वर्ष काढत होते..साळी नावाचे एक धुरंधर या गावात गेले..आणि त्यांच्या हाती लागला अद्भुत परंपरेचा वारसा..भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने एक छोट्या प्रमाणात उत्खनन केले पण त्यातून फार काही हाती लागले नाही.पण,साळी सरांनी हार मानली नाही..तिसऱ्या वेळेस मात्र उत्खनन केले आणि त्यांनी जगासमोर आणली एक वेगळी संस्कृती.

सावळदा येथे हे उत्खनन झाले म्हणून त्या संस्कृतीला नाव ठेवले "सावळदा संस्कृती"....


या उत्खननात खूप मोठ्या प्रमाणात हरप्पा संस्कृतीच्या मातीची भांडी सापडली त्यामुळे असे म्हणण्यात येते,की गुजरात सोबत जुन्या काळात आपला व्यापार होत असे.


2bhk अथवा 3bhk सारखी घरांची रचना..

गोलाकार छत..

सपाट जमिनीची,माती आणि चिखलाने सारवलेली फरशी..

शिंपल्याने सारवलेल्या भिंती..

एखाद्या सभ्य माणसाची घरे त्याकाळी अशी होती..


ज्याच्या घरासमोर मोठे अंगण असेल,ते त्या गावातील गुरुजनाचे-मार्गदर्शक (मुख्य) माणसाचे घर..


इथल्या भागात हत्यारे सापडली,ती जास्त करून हाडांपासून बनवलेली होती.एकूण 28 ठिकाणी त्याकाळी लोकांची वस्ती होती,असे त्या उत्खननातुन समोर आले.


या सावळदा गावाची खरी ओळख म्हणजे,महाराष्ट्रात शेतीची सुरुवात झाली ती याच भागातून..सुमारे दहा एक हजार वर्षांपूर्वी काळ्या मातीमध्ये सोनं उगवण्याची प्रक्रिया चालू झाली..अनेक वेगवेगळ्या अभ्यासकांनी-संशोधकांनी इथल्या मातीचे,सापडलेल्या अवशेषांचे संशोधन,सर्वेक्षण केले आणि यावर शिक्कामोर्तब ही करण्यात आलाय..


दक्षिण भारताच्या या वैभवशाली इतिहासाची पाळेमुळे आपल्या महाराष्ट्रात आहेत,याचा अभिमान नक्कीच असायला हवा..

Share on:

Comments





Recent Comment's

No comments available.


Related Blogs

×

Subscribe To Newsletter