IMAGE COURTESY : Source
Source: My Own Click
तोरणा आणि कॉम्रेड...!!
फोटोत जे घर दिसतय ना तिथे एका झुंजार नेतृत्वाचा जन्म झाला होता. शनिवारवाड्यावर २० हजारांचा दलित आणि कामगारांचा मोर्चा काढणारा इथे जन्मला. पांडू हवालदार चित्रपटात हाफ चड्डीत जो पोलिस दिसतो ना त्यांची फुल पॅण्ट करणारा एक कठोर गृहमंत्री इथं जन्मला. कॉ भाई वैद्य ह्या जेष्ठ समाजवादी नेत्यांचं हे जन्मस्थान. 'दापोडे' गाव म्हणून वेल्हा तालुक्यात आहे तिथं एक टुमदार वैद्यवाडी आहे तिथले हे देशपांडे.
मावळातील एक जात सर्व चांद्रसेनीय कायस्थ घराणी हि प्रचंड कर्तुत्वान. रोहिडमावळचे गुप्ते, हिरडसचे प्रधान, गुंजवणी-कानंद चे हे वैद्य देशपांडे, मोसे मावळातले दिघे-देशपांडे. भाईंना मावळाचा प्रचंड अभिमान. गृहमंत्री झाल्यावर त्यांनी मिळालेल्या शासकीय बंगल्याचं नाव ठेवलं "तोरणा". मावळाबद्दल च्या त्यांच्या प्रेमाला खरंच तोड नाही. मावळात आभाळाएवढी मोठी माणसं झाली त्यातले भाई वैद्य .
आज या तालुक्यातील मोजके सारंजामी नेते आहेत. त्यांना भाई कितपत माहिती असतील माहित नाही. हे वैद्य कानंद मावळचे देशपांडे. महाराजांच्या सेवेत अवघे कायस्थ खस्त झाले पण वारसा झुंझारपणाचा जागता ठेऊन गेलेत.
(फोटोत दिसणारे कॉ. भाई वैद्यांचे सख्खे चुलत बंधू)