
IMAGE COURTESY : Source
Source: Gemini (AI Generated)
जगप्रसिद्ध हुवर धरण
अतिशय शुष्क नेवाडा वाळवंटाच्या छाताडावर माणसाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उभे केलेले ऊंचच उंच हुवर धरण म्हणजे खर्या अर्थाने अमेरिकन नागरिकांच्या जिद्दीचे प्रतीक आहे. देशावर असणार्या महामंदीच्या काळातही देश हितासाठी घेतलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयाने नैऋत्य अमेरिकेतील नागरिकांचे जीवनमान आयुष्यभरासाठी बदलून गेले.
तसे या धरणाची ओळख बोल्डर होय. अमेरिकेवर असणार्या जबरदस्त आर्थिक महामंदीच्या काळात 1931 साली या धरणाचे काम हाती घेण्यात आले. या महाकाय आणि महत्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता देणे हे प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय खर्चाचे असले तरी सामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे या प्रकल्पातून तब्बल 20 हजार नागरिकांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे अन्नान्न दशा झालेल्या अनेक व्याकूळ जीवांची हे धरण भाग्यरेषा ठरले. हा प्रकल्प भाग्यरेषा ठरला असला तरी, हा डोलारा उभा करण्यात अनेक प्रकारची आव्हाने उभे होती. यातील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे कठोर हवामान होय. भयंकर उष्णता, अचानक येणारे पूर आणि हा सारा परिसर दुर्गम असल्याने आवशयक सामग्रीची वाहतूक करण्यात अनेक अडथळ्यांचा अभियंत्यांना सामना करावा लागला.
अनेक अडचणी असूनही हा प्रकल्प केवळ 5 वर्षांत पूर्ण करण्यास अभियंत्यांना यश आले अन कोलोराडो नदीवर साकारलेले हे धरण भविष्यासाठी एक जगप्रसिद्ध संरचना म्हणून साकारले गेले. महाकाय कोलोराडो नदीला वेसण घालणे ही काही साधी गोष्ट नव्हती, तरीदेखील कुठल्याही प्रकारच्या राजकरणापलिकडे जाऊन ३७९ मी लांब व २२१.४ मी उंच साकारण्यात आलेल्या या प्रकल्पाने युनायटेड स्टेट्समधील सर्वात मोठा जलाशय, लेक मीड तयार केला. या विस्तीर्ण जलाशयातून लाखो एकर जमिनी शेतीखाली येऊ शकल्या आणि अतिशय प्रगत सिंचन व्यवस्था या प्रांताला लाभली. एकेकाळी ओसाड असलेल्या या भूभागाची झालेली भरभराट हे या प्रकल्पाचे खरे यश असून, येथील जलविद्युत प्रकल्पातून 2080 मेगावाट पर्यन्त वीज उत्पादित केली जात असून दक्षिण-पश्चिम अमेरिकेतील लाखो घरे आणि व्यवसायांना वीज पुरवली जाते.
या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी आग्रही भूमिका मांडणारे अमेरिकन राष्ट्रपती 'हर्बर्ट हूवर' यांच्या नावे या धरणाचे नाव हुवर ठेवण्यात आले. हूवर धरण हे इंजिनियरिंगचा बहुआयामी चमत्कार आहे. आपण भविष्याकडे पाहत असताना, हे नावीन्य, साधनसंपत्ती आणि मोठ्या आव्हानांवर मात करण्याच्या मानवी क्षमतेच्या महत्वकांक्षेची आठवण करून देणारे स्मारक असल्याची मतं अमेरिकन नेते व्यक्त करत असतात.
हूवर धरण हे प्रतिकूल परिस्थितीतही अखंड प्रकल्प उभारण्याच्या देशाच्या क्षमतेची साक्ष आहे. आर्थिक आणीबाणीच्या उदासीन काळाच्या दरम्यान या बांधकामासाठी कोलोरॅडो नदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हजारो पुरुष आणि त्यांची कुटुंबे ब्लॅक कॅनियनमध्ये आली. कठोर आणि ओसाड जमिनीत, त्यांच्या काळातील सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी लागला ही खरच आमच्या जिद्दीची निशाणी असल्याचे येथे भेट देणारे पर्यटक आवर्जून सांगत असतात.
Share on: