IMAGE COURTESY : Source
Source: Wikipedia
इजिप्तची संस्कृती जगातील प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते
इजिप्तची संस्कृती जगातील प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते. पिरामिडसारख्या प्रचंड रचना या संस्कृतीत झाल्या, याच काळात तांबडा समुद्र, भूमध्य सागराला जोडण्याची कल्पनाहि तशी प्राचीन अगदी २००० वर्षांपूर्वी लोकांना अश्या कालव्याचे महत्व पटलेले होते. पूर्व आणि पश्चीम यांना जोडणारा खूप मोठा दुवा इजिप्त हा होता. इजिप्तच्या पूर्वेला एका अरुंद जमिनीच्या पट्ट्याने आफ्रिका खंड आशियाशी जोडले होते या अरुंद जमीनपट्टीला सुवेझ असे नाव होते. त्यामुळे इतिहास काळात इजिप्तवर डोळा ठेऊन असणाऱ्यांची कमी नव्हती. आणि त्याचा ताबा मिळविण्यासाठी अनेक युद्ध झाली.
व्यापारी मार्गांची उपलब्धता झाल्याशिवाय अर्ध जग जागच्या जागी गोठून जाण्याचे प्रकार आजही घडतील आणि तेव्हा देखील परिस्थिती तीच होती., देवाणघेवाण करतचं तर मनुष्य संस्कृती एकमेकांच्या विरुद्ध कुरघोडी करत मार्गक्रमण करत असते. तेराव्या - चौदाव्या शतकात पूर्व आणि पश्चिम आणि चीन यांच्यातील व्यापार तुर्कस्तान व इराण मार्गाने होऊ लागला. याच मार्गाने मार्कोपोलो चीनमध्ये गेले होता. याच मार्गाला सिल्करूट म्हणत पुढे १५ व्या शतकात तुर्कस्तानमधील आक्रमक सत्तांनी हा मार्ग बंद पाडला. या व्यापारामुळे इटलीतील जीनोव्हा आणि व्हेनिस हि बंदर भरभराटीला आली होती.
१४५३ नंतरचं पूर्वेकडे आणि भारताकडे जाण्याचा सागरीमार्ग शोधण्याची गरज युरोपीय राष्ट्रांना वाटू लागली. यात केप ऑफ गुड होपचा शोध लागला आणि ४०० वर्षे वाहतूक आफ्रिकेला वळसा मारत चालू राहिली. पुढे फ्रांस, इंग्लड यांनी भारताकडे येण्यासाठीची आणखी सोयीची वाट म्हणून कालवा योजना अवलंबली आणि मोठ्या राजकीय उलथापालथीतून हा कालवा जन्माला आला. फर्डिनंड द लेसेप्स या प्रसिद्ध फ्रेंच नागरिकाने या कालव्याची निर्मिती केली. अनंत अडचणींवर मात करुन १८६९ मध्ये कालव्याचे बांधकाम पूर्ण केले.
या साम्राज्यांना आशिया खंडातील कच्चा माल हवा होता., म्हणून सुरवातीपासूनच सुवेझ कालवा वादाच्या भोवऱ्यात अडकला. हे वाद १९५६ च्या इंग्लंड - फ्रांसच्या कालव्यावरील आक्रमणापर्यंत चालू राहिले
Share on: