एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: Facebook

भारतीय प्रजेच्या हाती सत्ता देऊन लवकरच आपण भारतातून काढता पाय घेत आहोत

भारतीय प्रजेच्या हाती सत्ता देऊन लवकरच आपण भारतातून काढता पाय घेत आहोत. अशी ग्वाही ब्रिटीश पार्लमेंट मध्ये घुमली अन त्याचे पडसाद पूर्ण भारतात संस्थानिक राजवटीत उमटण्यास सुरवात झाली. याचे सगळ्यात जास्त पडसाद उमटले ते काश्मीरमध्ये काश्मीर विलणीकरणसंदर्भात तिथली प्रजा जास्तच उतावीळ झाली होती. संस्थानासंबंधी धोरण आखण्यासाठी तेव्हा एक समिती देखील नेमण्यात आली.


काश्मीर विलानीकरणाच्या बाबतीतचे सर्व अधिकार काश्मीरनरेश महाराजा हरिसिंग यांना देण्यात यावेत असे काही जणांचे मत होते. तर याच्याविरुद्ध शेख अब्दुल्ला होते. शेख अब्दुल्ला हे त्या वेळचे काश्मीर मधले एक वादळी व्यक्तिमत्व. त्यांनी या गोष्टीविरुद्ध आंदोलन छेडले. राजा विरुद्ध उभारलेल्या या आंदोलनाचे नाव होते 'क्विट काश्मीर' हे आंदोलन चांगलेच भडकले. २० मे १९४६ रोजी शेख अब्दुलांना शासनाने अटक केली.


संस्थानासंबंधी धोरण आखण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष यावेळी जवाहरलाल नेहरू होते. राजेशाही सुटून प्रजेचे राज्य यावे असे जरी धोरण नेहरूंचे असले तरी त्याचे घटनात्मक प्रमुख संस्थानिक असावेत असे त्यांचे मत होते. या बाबतीत नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यामध्ये मतभेद होते., परंतु असे मतभेद असून सुद्धा शेख अब्दुल्लांनी उभारलेल्या क्विट काश्मीर चळवळीला नेहरूंचा पाठींबा होता. हे आंदोलन थांबविण्याविषयचा शिष्टाचार करण्यासाठी २४ जुलै १९४६ ला काश्मीरमध्ये जाऊन नेहरूंनी आंदोलन मागे घेण्यासाठी शेख साहेबांना राजी केले.


पहिला फोटो - शेख अब्दुल्ला यांचा आहे

दुसरा फोटो - काश्मीरनरेश राजा हरिसिंग यांचा आहे

तिसरा फोटो - काश्मीरचा नकाशा आहे

चौथा फोटो - जवाहरलाल नेहरू यांचा आहे


Share on:

Comments





Recent Comment's

No comments available.


Related Blogs

×

Subscribe To Newsletter