एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: Wikipedia

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या प्रेरणा जेव्हा इतिहासातून येतात

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या प्रेरणा जेव्हा इतिहासातून येतात....!! 

महाराजा सयाजीराव गायकवाड.

     मराठी जनांचा स्वाभिमानी स्वभाव हा स्वयंभू जरी असला तरी महापुरुषांच्या बाबतीत घडलेल्या घटनांनी तो वृद्धिंगत केला हे सर्वश्रुत आहे.शिवछत्रपतींची आग्रा भेट, बाजीराव पेशव्यांनी राजपुतान्यात सिंहासनांना दिलेला न्याय,दत्ताजी बाबांचा धिरोदात्त मृत्यू , अहिल्यादेवींनी राघोबादादाला सुनावलेले बोल, झाशीच्या राणीसाहेबांनी इंग्रजास दिलेलं आव्हान.ह्या एकंदर घटनांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी विश्वावर प्रभाव टाकला.

      पण,एका महत्वाच्या आणि क्रांतीकारी घटनेकडे अजून पाहिजे तसे मराठी जनांचे लक्ष गेले नव्हते ...बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड .इतिहासाचार्य वि का राजवाडे ज्यांना महाराष्ट्राच्या सप्तर्षीत सन्मानिय स्थान देतात.सयाजीरावांच्या समकालीन कारकिर्दीत महाराष्ट्रातील एक असे क्षेत्र नव्हते कि त्या सयाजीरावांचा "मिडास टच" नव्हता.मग,ते सामाजिक,राजकिय,शैक्षणिक किंवा औद्योगिक असो.सयाजीरावांची कारकिर्द ब्रिटीशांना किती डाचत होती ह्याची उदाहरणे य दी फडके ह्यांच्या विसाव्या शतकातील महाराष्ट्र ह्या खंडात आली आहेत.

    भारतभेटीवर आलेल्या पंचम जॉर्ज आणि राणी मेरी ह्यांना संस्थानिकांनी अभिवादन करण्यासाठी दिल्ली दरबार भरला होता.ह्या संस्थानिकांनी राजा आणि राणीला आपला राजपोशाख करत स्वतंत्र मुजरा करणे बंधनकारक होते .तशा प्रकारच्या सूचना संस्थानिकांना लॉर्ड हार्डींज ने दिल्या होत्या . सुरवातीला व्हाईसरॉय आणि ब्रिटिश भारतमंत्र्यांनी स्वतंत्र मुजरे केले.नंतर हैद्राबाद च्या नवाबाने आणि म्हैसूरच्या राजांनी आपल्या राजपोशाखासमवेत राजा राणीस तीनदा वाकून मुजरा करून राजा राणी स पाठ न दाखवता आपल्या जागेवर येऊन बसले.त्यांनंतर आलेल्या सयाजीरावांनी पंचम जॉर्ज ला न वाकता न झुकता मुजरा केल्या सारखं केलं ते ही एकदाच ,राणी मेरी ला तर त्यांनी मुजरा हि केला नाही.राज राणीला तडक पाठ दाखवून ते आपल्या आसनावर आले.हे सर्व घडत असताना सयाजीरावांनी राजपोशाख मात्र घातला नव्हता.

    पंचम जॉर्ज चा असा राजेशाही अपमान कुठेच झाला नव्हता .सरकार धार्जिण्या वृत्तपत्रांनी सयाजीरावांवर तर टिकेची झोड उठवली.सयाजीरावांना दरबारी रितीरिवाज ठाऊक होते.त्यांची गणना भारतातील शहण्या संस्थानिकांच्यात वरच्या क्रमात होत असे.हे त्यांनी अनावधानाने केलं नाही जाणिवपूर्वक केलं असं ब्रिटिश नोकरशाही चं म्हणणं पडलं.फक्त कलकत्याच्या "अमृतबाझारपत्रिका" ह्या वृत्तपत्राने मात्र सयाजीरावांच्या बाणेदारापणाचे कौतुक केलय.भारतातील इतर संस्थानिकांनी हि सयाजीरावांवर टिकेचीझोड उठवली तेव्हा नामदार गोखले यांच्या सल्ल्यानुसार सयाजीरावांनी जुजबी खुलासा केला.पण, हा अपमान ब्रिटिश नोकरशहांना खूप झोंबला.त्यांची सयाजीराव ब्रिटिशनिष्ठ नसलेल्याची खात्री बळकट झाली असे पुरावे प्रचंड प्रमाणात त्यांच्या कागदपत्रात दिसतात.

       सयाजीरावांना इतिहासाची जाण होती आणि वास्तवाचे भान ही....सयाजीरावांना मानाचा मुजरा..!!

Share on:

Comments





Recent Comment's

No comments available.


×

Subscribe To Newsletter