एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: X (Formerly Twitter)

युद्धाची दिशा ठरवणारे युद्ध..!

"ओय थंड रख ओय लेखराज ये हरियाली कम और दलदल ज्यादा है. अपना पिंड यहा से हजारो किलोमीटर दूर है पगले" | कॅप्टन गिल

"कॅप्टन जी  पिंड तो दूर है. पर बंगाल की इस मिट्टी ने भी आजादी की लीये खून की होली कुछ कम नही देखी." | हवलदार लेखराज 

(फाळणी नंतर अस्तीत्वात आलेल्या पूर्व व पश्चिम पाकिस्तानमधील तणाव भारतासाठी डोकेदुखी ठरत होता. शरणार्थी म्हणून येणार्‍यांना आपण रोखू शकत नसलो तरी देशाच्या कर्तबगार पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या मर्यादा ठाऊक होत्या. यासाठी त्यांनी हा प्रश्न  जागतिक स्तरावर मांडून यावर उपाय योजना काढण्यासंदर्भात बरेच प्रयत्न करून पहिले पण जगाच्या उढ्धारकर्त्या देशांपैकी काहींनी डोळ्यावर हात ठेवले तर काहींनी कानावर त्यामुळे आपणच हा विषय मार्गी लावू हे ठरवून एका नव्या देशाची निर्मिती करण्याचे मनसुबे एका सामर्थ्यवान महिलेने रचले आणि आपल्या जवानांच्या शौर्यावर ते तडीसही न्हेले.) 

दलदलीने भयंकर असलेल्या त्या परिसरातून वाट काढून सुरू केलेले मार्चिंग संपून आता निश्चित करण्यात आलेल्या मोक्याची जागी पोहचून रेजिमेंटने आपल्यासाठी ट्रेंचेस खोदण्याच्या कामास सुरवात केली होती. हवलदार लेखराजचा आवेश सोडला तर अजून तरी वातावरण तसे निवांत होते. पण युद्धभूमीवरील ही शांतता किती भयनाक असती याची प्रत्येकालाच जाणीव होती. त्यात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानी आर्मीला सरप्राईज द्यायचे आपले मनसुबे आता पूर्ण होणार नव्हते कारण दुश्मनाची खबर काढायला गेलेल्या पेट्रोलिंग पार्टीची लढत त्यांच्या पेट्रोलिंग युनिट सोबत झाली होती. पण दुसरी पेट्रोल पार्टी दुश्मन टॅंकचा आवाजाने माग घेत होती. 

ट्रेंचेसची खोदाई सुरू असतानाच अचानक पंजाब रेजिमेंटच्या त्या 14 व्या तुकडीवर तुकडीवर पाकिस्तानी आर्मीने हल्ला करण्यास सुरवात केली. हा हल्ला अतिशय जबरदस्त पद्धतीचा होता असे पहिल्यांदाच घडत होते की दुश्मन सैन्याने एक इन्फंट्री बटालियनवर टॅंक रेजिमेंट सोबत अक्षरशः एका ब्रिगेडएवढ्या मोठ्या तुकडीने हल्ला केला होता. पंजाब रेजिमेंटच्या सैन्याला सावरायला काही वेळ लागलाच कारण हल्ला ही तेवढा भयंकर होता. पण काहीच वेळात सावरल्यावर हवालदार लेखराजच्या तुकडीने प्रतिकार करण्यास सुरवात केली. हे ठिकाण होते गरीबपुर नावाचे. नावाप्रमाणेच गरीब शरणार्थी पाकिस्तानी अत्याचारला वैतागून विस्थापन करत असताना याच गावात बसून पाकिस्तानी सैन्याने निर्दोषांची कत्तल चालवली होती. आर्टिलरी शेलिंगसोबत त्यांचे जेट बॉम्ब आणि गोळ्यांचा पाऊस पाडत असत नि यामुळे आपल्या सरहद्दीतील लोक जीव व वित्त हानी होऊन त्रासले होते. याचसाठी इंडियन आर्मी ने देखील गरीबपुर आपल्या नकाशावर चांगलेच नोंदवून ठेवले. 

पहाटे धुक्याच्या दुलईत काही दिसत नसले तरी रोरावणारे टॅंक आणि एल एम जी फायरिंग मजबूत सुरू राहिली. अगदी 25 मीटरच्या अंतरावर येऊन, टॅंक उभारले होते, तेव्हा आपल्या छातीचा कोट करून हवालदार लेखराज आपली RCL गन घेऊन दुश्मन टॅंकचा सामना करायला उभा ठाकला. टॅंक समोर RCL म्हटले तर रांजणभर पाण्यासमोर चिलीमभर विस्तवच म्हणावा लागेल. पण त्या जिद्दी हवालदाराने आपल्या आरसीएल ने टॅंक जाळून टाकला शेठ. 

हत्याराला हत्यारे खेटावीत इतक्या जवळ जवळ हे सगळे चालू असताना दुश्मनाच्या पायदळाने एका माणसाने आपला टॅंक जाळल्याचे पाहून अगदी तोंडातच बोटं घालायची राहिली होती. पाकिस्तानच्या M 24 शेफी टॅंक समोर आपले PT 76 आता आग ओकू लागले होते. सकाळी 8.30 वाजता जेव्हा धुक्याची दुलई हटली तेव्हा अस्ताव्यस्त पडलेले पाकिस्तानी सैनिक, बरबाद झालेले दुश्मनाचे टॅंक आणि 3 माघार घेऊन पळून जाणारे सूस्थितीतील टॅंक असेच काय ते दृश्य होते. दुश्मन सैन्याने जेव्हा शरणागती पत्करली तेव्हा समजले की ही पाकिस्तानच्या सर्वोत्कृष्ट ब्रिगेड पैकी एक ब्रिगेड होती जिच्या सोबत पंजाब रेजिमेंटची एक 14 वी बटालियन आणि 1 टॅंक स्क्वाड्रन ने दुश्मनाला धूळ चारली. यानंतर दुश्मन जेट देखील बॉम्ब फेकते झाले पण त्यांनाही काही विशेष यश आले नाही, याच फायटर जेटमधून उडी मारता झालेला एक पायलट भारताचा 71च्या पूर्ण युद्धाचा पहिला युद्धबंदी ठरला असे सांगितले जाते. 

या लढाईनंतर भारतीय सेनेने मुक्तीबाहिनीशी संधान बांधले व मित्रोबाहिनीची रचना केली. पुढील काही दिवसांत झालेल्या बोयराच्या लढाईत मित्रोबाहिनीने पूर्व पाकिस्तानात (आताचे बांगलादेश) असलेल्या पाकिस्तानी वायुसेनेच्या तुकड्यांचा पराभव केला व युद्धास तोंड फुटले त्याविषयी परत कधीतरी..! 

Share on:

Comments





Recent Comment's

No comments available.


Related Blogs

×

Subscribe To Newsletter