IMAGE COURTESY : Source
Source: Facebook
पुणे नगरपालिकेचे पहिले सरकार नियुक्त सभासद होण्याचा मान या व्यक्तींना मिळाला...
पुणे नगरपालिकेची स्थापना २० मे १८५७ इसवी रोजी होणार होती. परंतु १० मे १८५७ ला देशात व विशेषतः उत्तर भारतात ब्रिटीश सत्तेविरुद्ध फार मोठे बंड झाले. त्याचे पडसाद पुणे शहरावर उमटणं स्वाभाविक होतं. नानासाहेब पेशवे पुणे शहरात येणार अशा तर्हेच्या बातम्या या शहरात पसरल्या होत्या. त्यामुळे ब्रिटीश सरकारने पुणे नगरपालिकेच्या स्थापनेचा २० मे १८५७ पुढे ढकलला व पुणे नगरपालिकेची स्थापना प्रत्यक्षामध्ये १० मे १८५८ इसवी रोजी झाली.
पुणे नगरपालिकेचे पहिले सरकार नियुक्त सभासद होण्याचा मान या व्यक्तींना मिळाला...
१) गणपतराव बाळ नातु, सरदार
२) वामनराव महादेव सरदार
३) रा. सा. भास्कर दामोदर
४) रा. बापु रावजी मांडे
५) नारायण आत्माराम सावकार
६) जिवनजी सुलतानजी मर्चंट
७) सखाराम मळसाराम सावकार
८) नरपतगीर गुरु किसनगीर मर्चंट
याशिवाय पुढील अधिकारी या नगर पालिकेचे पदसिद्ध सभासद होते
१) कलेक्टर
२) मॅजिस्ट्रेट
३) कमिशनर्स
४) जज्ज
५) प्रिन्सिपाॅल सदर अमीन
६) हुजुर डेप्युटी
शब्दसंग्रह व माहिती संकलन : अभिजीत बारवकर,पुणे.
______________________